Share
BOOKONTHEBOAT
शब्दफुलं
शब्दफुलं
Couldn't load pickup availability
Genre: Poems
Language: Marathi
Pages: 86
Binding: Paperback
Book size: 5.5X8.5 inch
ISBN: 9788199201200
Author: Biswas Kulkarni
* शब्दफुलं-प्रेम,आठवणी,मैत्री आणि जीवनाच्या चार ओळी *
कधी एक क्षण मनाला भिडतो आणि आपण तो जपून ठेवू इच्छितो.
कधी एखादी आठवण सुगंधासारखी मनात दरवळते.
कधी मैत्री, कधी विरह, तर कधी जीवनाची साधी शिकवण ...
हे सगळं जर चार छोट्या ओळीत मांडता आलं-तर तेच एक शब्दफुल.
या पुस्तकात-
• गुलाबा सारखे प्रेम
• मोगऱ्याच्या च्या सुगंधा सारखी मैत्री
• जाई सारख्या कोमल आठवणी
• चाफ्याची खरी शिकवण
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या कोपऱ्यात घेऊन जाईल. कधी हसवेल, कधी रडवेल, आणि कधी शांतपणे डोळे मिटून बसायला लावेल. ह्या फक्त चारोळ्या नाहीत ...
ही मनातून उमललेली शब्दफुलं आहेत, ज्यांचा सुगंध वाचकाच्या मनापर्यत पोहोचावा-हीच इच्छा.
भावना शब्दामध्ये गुंफण्याची कला ही एक देणगी आहे, आणि विश्वास कुळकर्णी याना ती लाभली आहे. त्यांच्या लेखणीतून उमटणार्या चारोळ्या वाचकांच्या मनाला थेट स्पर्श करतात.,गेल्या अनेक वर्षांत त्यांनी कविता, चारोळ्या आणि लेखन केलं आहे. Supply chain, लीडरशिप, पर्यावरण या विषयी त्यांचे लेखन industrial मासिकातून प्रसिद्ध झाले आहे.
लहान मुलानी स्क्रीन टाइम कमी करून वाचनाकडे वळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गेली 4 वर्ष ते वेध पुस्तकांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत शब्दफुलं हा त्यांचा पहिला काव्य संग्रह असून त्यांच्या मनातील विचार, भावनांचे रंग, जीवनातील साधी सुंदर तत्त्व याची सुंदर चित्रण आहे

